
उंडवडी : शिर्सुफळ (ता. बारामती ) येथील साठवण तलावातील पाणी संपल्यानंतर सहा दिवसापूर्वी बंद पडलेली शिरसाई उपसा सिंचन योजना आज (ता. १९ ) शनिवारी रोजी दुपारी १२ च्या दरम्यान सुरु करण्यात आली. या योजनेतून लाभार्थी गावांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे.