Annabhau Sathe Memorial Protest
Sakal
शिरूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून शांततामय व सनदशीर मार्गाने उपोषणाला बसलेल्या लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कोअर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांना पाठिंब्यासाठी आज समाजबांधवांनी शहरातून जाणारा पुणे - नगर रस्ता दोन तासांहून अधिक काळ रोखून धरला. या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही, मात्र अचानक झालेल्या रास्ता रोको मुळे पोलिस दलासह प्रशासनाची धावपळ उडाली.