The Shirur APMC election campaign has intensified with political allegations overshadowing farmer-centric issues ahead of polling.
sakal
शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना शेतकरी हिताच्या विषयांना तिलांजली देत दोन्ही बाजूंनी आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आमदार माऊली कटके केवळ निवडणूकीपूरते उगवत असल्याचा आरोप एका बाजूने तापविला असताना दुसऱ्या बाजूने घोडगंगा साखर कारखाना बंद चा मु्द्दा पुन्हा नव्या दमाने उचलणयात आला आहे. शेती व शेतकरी हे विषय बाजूला पडले असून, अर्थकारणासह नात्या - गोत्याच्या राजकारणाला कमालीचे महत्व आले आहे.