Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

दुसरे लग्न करण्यासाठी अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून ११ महिन्याच्या मुलाचा निर्घृण खून; आरोपी आईला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
crime

"आई नको काळजाचा तुकडा!" शिरूरमध्ये दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी ११ महिन्यांच्या बाळाचा निर्घृण खून; विहिरीत फेकली बॅग.

sakal

Updated on

शिरूर : भांबर्डे (ता. शिरूर) येथे ११ महिन्याच्या मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूजा रवींद्र पवार (वय २२) यांना शिरूर न्यायालयाने शुक्रवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सतत किरकिर करीत असलेले बाळ दुसरे लग्न करण्यासाठी अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची कबूली पूजा यांनी दिली असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दुसऱ्या लग्नामध्ये अडथळा ठरणाऱ्या बाळाचा खून करणाऱ्या महिलेचे श्रीगोंदे येथील तरूणाशी पहिलेही एक लग्न झाले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आल्याने या धक्कादायक घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com