

BSNL office break-in solved; ₹18.5 lakh jewellery recovered.
Sakal
शिरूर : शिरूर शहरातील बीएसनएनल चे कार्यालय फोडून तेथील मदरबोर्ड व इतर साहित्य चोरून नेतानाच तेथील कर्मचाऱ्याच्या कपाटातून रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या तिघांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिरूर व सासवड पोलिसांच्या मदतीने ही धाडसी कारवाई केली. गजाआड केलेल्या या टोळीकडून तब्बल १८ लाख पन्नास हजार रूपये किंमतीचे सोन्या - चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.