Shirur Gun Firing : चोरट्यांनी सोसायटीत चोरीच्या उद्देशाने घरात घुसून केला गोळीबार; पायाला गोळी लागल्याने मेडिकल व्यावसायिक जखमी

पहाटे चोरट्यांनी येथील आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसून गोळीबार केला. यात डाव्या पायाला गोळी लागल्याने मेडिकल व्यावसायिक जखमी झाला.
Gun Firing in Shirur

Gun Firing in Shirur

sakal

Updated on: 

शिरूर - शहरातील भाजी बाजार परीसरात महिलेच्या डोक्याला बंदूक लावून मंगळसूत्र हिसकावण्याच्या कालच्या प्रयत्नानंतर आज पहाटे चोरट्यांनी येथील आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसून गोळीबार केला. यात डाव्या पायाला गोळी लागल्याने मेडिकल व्यावसायिक जखमी झाला असून, या घटनेनंतर परीसरात खळबळ उडाली. गोळीबाराच्या या थरारक घटनेदरम्यान, १२ वर्षांच्या मुलीसह व्यापाऱ्याच्या कुटूंबियांकडून चोरट्याला जोरदार प्रतिकार झाल्याने त्याला हात हलवत पळ काढावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com