Shirur News : शिरूरमध्ये सावकारकीच्या जाचातून व्यावसायिकाचा मृत्यू; दोन कोटी ३० लाख रुपये परत करूनही अतिरिक्त पैशांची मागणी केल्याचा आरोप

Shirur Moneylending Harassment Case : शिरूरमधील व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी सावकारकीच्या जाचाचे आरोप समोर आले आहेत. एक कोटी ८२ लाखांच्या कर्जापोटी दोन कोटी ३० लाख रुपये परत करूनही पैशांची मागणी आणि धमक्या दिल्याची फिर्याद आहे.
Shirur Moneylending Harassment Case

Shirur Moneylending Harassment Case

esakal

Updated on: 

शिरूर : व्यावसायिक कारणासाठी सुमारे एक कोटी ८२ लाख रूपये व्याजाने घेऊन त्यापोटी दोन कोटी तीस लाख रूपये परत करूनही पुण्यातील व्यापाऱ्याने दिलेल्या त्रासाला व व्याजापोटी केलेल्या पैशांच्या मागणीला, मारहाणीला कंटाळून येथील व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सावकारकीच्या जाचातून झालेल्या या घटनेने आणि आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीने खळबळ उडाली असून, शिरूर पोलिसांकडून या प्रकरणाबाबत गुप्तता पाळली जात असल्याच्या संशयातून संतापाचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shirur Daylight Burglary: Gold Jewellery and Cash Worth Over Rs 2.5 Lakh Stolen
Police Constable Arrested in Shirur Bribery Case After One-and-a-Half Months
Shirur Politics
two groups clashed within the premises of the Shirur Police Station