Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

शिरूर बायपासवर पुन्हा मृत्यूचा सापळा; तुटलेल्या दुभाजकातून जाणाऱ्या तरुण उद्योजकाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, जबाबदारी टोलवाटोलवीत अडकलेली
A fatal accident occurred near the broken divider on the Pune–Ahilyanagar bypass after a speeding car hit a two-wheeler rider, resulting in the death of Somnath Borhade.

A fatal accident occurred near the broken divider on the Pune–Ahilyanagar bypass after a speeding car hit a two-wheeler rider, resulting in the death of Somnath Borhade.

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर शहराबाहेरून (बायपास) जाणाऱ्या पुणे - अहिल्यानगर रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची धग अद्याप शमलेली नसताना आणि बाह्यवळण मार्गाच्या भयावह दूरवस्थेची धूळ अद्याप पूर्णपणे खाली बसलेली नसतानाच आज या बायपासवर पुन्हा एका दूचाकीस्वाराचा बळी गेला. तुटलेल्या दूभाजकातून दूचाकी घातल्यानंतर मुख्य रस्त्याला लागत असतानाच मागून आलेल्या भरधाव मोटारीची धडक दूचाकीला बसल्याने व काही अंतर दूचाकीसह फरफटत नेल्याने सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३०, रा. बोऱ्हाडे मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या तरूणाचा मृत्यु झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com