

A Shirur court sentenced a man to 15 months' rigorous imprisonment for assaulting a job seeker and robbing him of his motorcycle and mobile phone.
शिरूर : कामाच्या शोधात असलेल्या तरूणाला काम देण्याच्या अमीषाने एकांतात नेऊन मारहाण करून त्याची दूचाकी व मोबाईल फोन चोरून नेणाऱ्या चोरट्याला शिरूर न्यायालयाने १५ महिने कठोर कारावासासह दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे अमीष दाखवून फसवणूकीचे प्रकार वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर न्यायालयाच्या या निकालाने अशा 'नस्त्या उद्योगांना' पायबंद बसणार आहे.