Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारी, नशेच्या विळख्याविरोधात नीलेश वाळूंज यांचा तहसीलसमोर सत्याग्रह; आई, पत्नी व मुलींच्या अन्नत्यागाने आंदोलनाला कुटुंबीयांचा सक्त पाठिंबा
शिरूर : सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांच्या, कायदा - सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठीच्या सत्याग्रह आंदोलनात बुधवारी आठव्या दिवशी त्यांची आई मंदा वाळूंज, पत्नी अश्विनी वाळूंज, मुली नक्षत्रा व मान्यता या देखील सहभागी झाल्या होत्या.

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर शहर व परिसरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शिरूर तालुका नशामुक्त करण्याच्या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा आज दिला. दरम्यान, सत्याग्रह आंदोलनाच्या आठव्या दिवशी वाळूंज यांची आई, पत्नी व दोन्ही मुलींनी आज आंदोलनस्थळी थांबून दिवसभर अन्नत्याग केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com