Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Shirur Daylight Burglary: Gold Jewellery and Cash Worth Over Rs 2.5 Lakh Stolen : शिरूरच्या गजबजलेल्या मुंबई बाजार परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Shirur Daylight Burglary: Gold Jewellery and Cash Worth Over Rs 2.5 Lakh Stolen

Shirur Daylight Burglary: Gold Jewellery and Cash Worth Over Rs 2.5 Lakh Stolen

esakal

Updated on: 

शिरूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मुंबई बाजार परिसरात आज भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला. भर पेठेतील बंद घराच्या मागील बाजूची खिडकी फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सुमारे दोन तोळे वजनाच्या दागिन्यांसह सव्वादोन लाख रूपयांची रोकड चोरून नेली. रात्री उशिरापर्यंत शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदविण्याचे काम चालू होते.

Loading content, please wait...