Pune Accident
esakal
-प्रमोल कुसेकर
आंधळगाव : न्हावरे–चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील नागरगाव (ता. शिरूर)हद्दीतील नलगे वस्ती येथे शनिवारी (ता.१४) मध्यरात्री भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारीला दिलेल्या भीषण धडकेत (Shirur Accident) एकाच कुटुंबातील बाप, चिमुकली मुलगी आणि मेहुणा जागीच ठार झाले, तर पत्नी गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. निमोणे गावावर शोककळा पसरविणारी ही घटना संतापजनक ठरली आहे. (Maharashtra Road Accident)