Shirur News: दिवाळीसाठी भरलेला माल आगीत खाक; शिरूरमधील व्यावसायिकाचे दुकान-गोदाम राख, शिरूरकरांचा मदतीचा हात

Shirur Businessman Loses 60 Lakh Rupees in Shop Fire: दिवाळीसाठी भरलेला ३० लाखांचा माल आगीत खाक; शिरूरमध्ये दुकान-गोदाम जळून राख
Diwali Stock Worth 30 Lakh Rupees Destroyed in Shirur Shop Fire Locals Extend Financial Help to Affected Businessman

Diwali Stock Worth 30 Lakh Rupees Destroyed in Shirur Shop Fire Locals Extend Financial Help to Affected Businessman

esakal

Updated on: 

शिरूर : शहरातील लाटेआळी परीसरातील स्टेशनरी व खेळणीच्या दुकानाला आणि दुकानाशेजारील गोदामाला काल रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत दुकान व गोदाम जळून खाक झाले असून, सुमारे तीस लाख रूपयांहून अधिकचा माल बेचिराख झाला. एकूण साठ लाख रूपयांचे नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आकाशात फुटलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या या दुकानावर व गोदामावर पडल्याने आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Loading content, please wait...