Shirur Ganpati Visarjan: शिरूर शहरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुका ; ढोल-ताशे, बॅंड, टाळ-मृदुंगाचा गजर, गुलाल आणि आकर्षक रथांमुळे जल्लोष रंगला.

Traditional Music and Decorative Chariots: शिरूरकरांनी गणरायाला भक्तिभावाने निरोप देत डीजे-ढोलताशांच्या जल्लोषात पर्यावरणपूरक विसर्जन, प्रबोधनात्मक देखावे, महिलांचा शंभर टक्के सहभाग आणि आकर्षक रथसजावटींनी शहरभर उत्सवमय वातावरण
Shirur Ganpati Visarjan

Shirur Ganpati Visarjan

esakal

Updated on: 

शिरूर, : कुठे डीजे चा दणदणाट तर कुठे ढोल - ताशांचा मर्दानी बाज... कुठे बॅंड च्या तालातील मधूर सुरावटी तर कुठे टाळ - मृदुंगाचा गजर... गुलालासोबत भंडारा अन फुलांच्या पाकळ्यांची मुक्त उधळण... बेभान जल्लोषाला कुठे भक्तीची जोड अन ग्यानबा - तुकारामांचा जयघोष... लुकलुकणाऱ्या दिव्यांत, प्रखर प्रकाशझोतात, सजावटींच्या मखरात खुलून आलेले 'श्रीं'चे मंगलमय प्रसन्न रूप अन् आसमंतात दुमदूमणारा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा आर्त स्वर... आपल्या आगमणाने आणि वास्तव्याने गेले बारा दिवस वातावरणात आनंद आणि प्रसन्नता भरणाऱ्या गणरायाला शिरूरकरांनी भक्तीभावाने निरोप दिला. शिरूर शहर व परिसरातून आलेल्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूका बारा तासांहून अधिक काळ रंगल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com