Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

शिरूरच्या श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरातील दानपेटी फोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
Jain Temple Robbery Case

Jain Temple Robbery Case

Sakal

Updated on

शिरूर : येथील भरबाजारपेठेतील जैन मंदिरावर दरोडा टाकून तेथील सुरक्षा रक्षकाला शस्त्राने धमकावून मंदिराच्या प्रवेशद्वारासह दानपेटी फोडून भाविकांनी दान केलेली रक्कम चोरून नेणाऱ्या तिघांना शिरूर न्यायालयाने २५ महिन्यांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. जैन धर्मियांत अत्यंत महत्व असलेल्या आणि शहराचा धार्मिक ठेवा असलेल्या या मंदिरातील दरोडा प्रकरणी चोरट्यांना झालेल्या शिक्षेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com