डॉ. कोल्हे, आढळरावांकडून टोलेबाजीच्या अक्षता; आमदार मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नात राजकीय मंडळींची मांदियाळी

पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीचा विवाह सोहळा शनिवारी (ता. ३०) थाटामाटात पार पडला. यानिमित्ताने राजकीय मंडळींची मांदियाळी जमली होती.
shirur lok sabha dr amol kolhe and adhalrao patil criticism politics
shirur lok sabha dr amol kolhe and adhalrao patil criticism politicsSakal

Chakan News : पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीचा विवाह सोहळा शनिवारी (ता. ३०) थाटामाटात पार पडला. यानिमित्ताने राजकीय मंडळींची मांदियाळी जमली होती. राजकीय मंडळी एकत्र जमल्यावर शाब्दिक चकमक होणार नाही, असे शक्यच नाही.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासह आमदार मोहिते यांनी शाब्दिक टोलेबाजी करत चांगलीच खसखस पिकवली. यामुळे विवाह सोहळा म्हणजे राजकीय टोलेबाजीचे व्यासपीठ ठरले. त्यामुळे उपस्थितांनाही हसू आवरणे कठीण झाले होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा देताना, ‘‘घड्याळ सुटलं म्हणून वेळ जुळेना झाली.

पण वधू, वरांच्या आयुष्यात समाधान, सुखाची तुतारी वाजावी’’असे सांगितले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उमटला. डॉ. कोल्हे यांच्या वक्तव्याला आमदार मोहिते यांनी हसून दाद दिली. माजी खासदार आढळराव पाटील यांनीही शुभेच्छापर विचार व्यक्त केले. आमदार मोहिते यांचे कौतुक करून मोहिते यांचा उल्लेख ‘माझे स्नेही’ असा केला.

आढळराव पाटील आणि आमदार मोहिते हे एकाच पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने आता त्यांचा स्नेह वाढणार आहे. आमदार मोहिते व आढळराव पाटील यांनी दिलखुलास चर्चा केली. माजी आमदार सोनवणे यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त करताना ‘‘आमदार मोहिते हे स्पष्ट वक्ते व शब्दाला पक्के आहेत’’ असे सांगितले. विवाह सोहळ्यातील टोलेबाजीला उपस्थितांनीही हसून दाद दिली.

मोहिते यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांनी आवर्जून भेट दिली. आमदार मोहितेंशी दिलखुलास चर्चा केली. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली, भोसरी, पिंपरी-चिंचवड या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार मोहिते यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेड तालुक्यात आमदार मोहिते यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार मोहिते महायुतीच्या उमेदवाराला किती मदत करतात आणि खेड तालुक्यातून किती मताधिक्य देतात याकडे महायुतीच्या नेत्यांचे अधिक लक्ष आहे, असे बोलले जाते.

माजी खासदार आढळराव पाटील यांनी मोहितेंशी असलेला स्नेह अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात घड्याळ आणि तुतारी या पक्ष चिन्हांचा उल्लेख करून ‘सुखाची तुतारी वाजावी’ असे बोलून नेमका काय संदेश दिला आहे, हा मात्र उपस्थितांना पडलेला प्रश्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com