शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रश्न मार्गी लागणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रश्न मार्गी लागणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रश्न मार्गी लागणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

मंचर - मरकळ (ता.खेड) येथील भामा- आसखेड कालव्यासाठी जमिनीचे केलेले संपादन वगळण्याबाबत, डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील गायरान क्षेत्रावरील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी होण्याविषयी, हडपसरमधील मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये लोकांचे प्रलंबित प्रश्न, कवठे यमाई येथील शेकडो एकर क्षेत्रावरील चुकीचे भोगवटादार शिक्के कमी करणे, आदीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत" असे आदेश संबंधित खाते प्रमुखांना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील, देविदास दरेकर, डॉ. सुभाष पोकळे, मांजरीचे सरपंच शिवराज घुले पाटील, कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांच्यासह विविध गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातीलविविध समस्या सोडवण्याची गरज आहे. असे आढळराव पाटील यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. 'शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित कामे व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही केली जाईल.' असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी आढळराव पाटील यांना धन्यवाद दिले.

Web Title: Shirur Loksabha Constituency Issue Will Be Resolved Collector Dr Rajesh Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..