Shirur Loksabha election 2024 : प्रचारसाहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात? शिरुरमधल्या मांजरी केंद्रातील प्रकार, कोल्हेंचा आरोप

''मांजरी ( हडपसर विधानसभा) शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी..! सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत!'' अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत त्यासोबत गोंधळ झालेला व्हिडीओ शेअर केला आहे.
Shirur Loksabha election 2024 : प्रचारसाहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात? शिरुरमधल्या मांजरी केंद्रातील प्रकार, कोल्हेंचा आरोप

पुणेः प्रचार साहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात थांबल्याचा प्रकार घडला असून त्यामुळे मतदान केंद्रात गोंधळ उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सोशल अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत असा आरोप केला.

''मांजरी ( हडपसर विधानसभा) शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी..! सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत!'' अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत त्यासोबत गोंधळ झालेला व्हिडीओ शेअर केला आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रातील कर्मचारी एका एजंटवर भडकेलेल दिसत आहेत. ''तू कोणाचा माणूस आहेस?'' असं विचारल्यानंतर तो तरुण मी शिवाजीराव आढळराव पाटलांचा एजंट असल्याचं सांगत आहे.

Shirur Loksabha election 2024 : प्रचारसाहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात? शिरुरमधल्या मांजरी केंद्रातील प्रकार, कोल्हेंचा आरोप
Lok Sabha Elections 2024: "मला त्यात शून्य इंटरेस्ट, पण कोणाला मत द्यायचं हे..."; राजकारणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला सुबोध भावेचं उत्तर

''प्रचारसाहित्य घेऊन हा माणूस आतमध्ये कसा आला?'' असा प्रश्न कर्मचारी करत आहेत. पोलिसांवरही प्रश्न उपस्थित करुन चेकिंग झाली नाही का?, असं विचारण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणी अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रियादेखील दिली असून मांजरी मतदान केंद्रात गंभीर प्रकार घडल्याने आक्षेप व्यक्त केला. या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचंही कोल्हेंनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com