Shirur Politics : आमदार माऊली कटके यांचा नगर परिषदेच्या कारभारात हस्तक्षेप नाही; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी आरोप फेटाळले

Shirur Municipal Council Politics and President Aishwarya Pacharne Statement : शिरूर नगर परिषदेचा कारभार सक्षमपणे सुरू असल्याचा दावा नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी केला. आमदार माऊली कटके यांचा कारभारात हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकीय आरोपांचे खंडण केले.
Shirur Politics

Shirur Politics

esakal

Updated on: 

शिरूर : दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारिवाल व माजी नगराध्यक्ष शहिदखान पठाण यांची सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक कारभाराची शिरूर नगर परिषदेची परंपरा सक्षमपणे चालवित असून, माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे व माजी उपनगराध्यक्ष स्व. गणेश पाचर्णे यांच्या दमदार कार्याचा उज्ज्वल वारसा त्याच खंबीरतेने पुढे नेत असल्याचे शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार माऊली कटके यांचा नगर परिषदेच्या कारभारात कुठलाही हस्तक्षेप नसताना त्यांना विनाकारण बदनाम करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...