

Massive Anti-Encroachment Drive: Shirur Municipal Council Deploys Bulldozers
Sakal
शिरूर : शहरातील मुख्य रस्त्यांसह, गल्लीबोळांतील वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर सोमवारी नगरपरिषदेचा बुलडोझर फिरला. नगर परिषद प्रशासनाकडून आज एकाच वेळी तीन पथकांद्वारे केलेल्या कारवाईत सुमारे नव्वदहून अधिक टपऱ्या, तात्पूरती शेड, पत्र्याच्या भिंती काढून टाकण्यात आल्या. अतिक्रमणाविरूद्ध नगर परिषदेचा हातोडा बरसत असताना काही ठिकाणी विरोध झाल्याने तणावाचे वातावरण पसरले.