

Political setback for Shirur’s ruling alliance as five councillors exit.
Sakal
शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'शिरूर नगर परिषद गट' या सत्ताधारी आघाडीला अंतर्गत राजकीय कलहातून तडे गेले असून, उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेतील सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलली असून, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हादरा बसला आहे.