Shirur MNS Protest: शिरूर नगर परिषदेविरोधात मनसेचे महिबूब सय्यद यांचे अन्नत्याग आंदोलन तीव्र; महिला सफाई कामगारांसह विविध संघटनांचा ठाम पाठिंबा

घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार, किमान वेतन व सफाई कामगारांच्या घरांसह विविध मागण्यांसाठी महिबूब सय्यद यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम; महिला सफाई कामगारांसह नगरसेवक व संघटनांचा वाढता पाठिंबा
The hunger strike at Shirur Municipal Council highlights demands for better solid waste management and fair wages for contract sanitation workers.

The hunger strike at Shirur Municipal Council highlights demands for better solid waste management and fair wages for contract sanitation workers.

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनागोंदीकडे लक्ष वेधण्यासाठी व ठेकेदारीतील सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानूसार वेतन मिळावे, या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनात आजही मार्ग निघू शकला नाही. दरम्यान, या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी महिला सफाई कामगारांनीही या आंदोलनात सहभाग घेत ठिय्या दिला, तर अनेक नगरसेवकांसह विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com