

Shirur National Lok Adalat settles 9,827 pre-litigation cases and facilitates recovery of over ₹12.45 crore.
Sakal
शिरूर : येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ९ हजार ८२७ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून सात कोटी ९१ लाख ५८ हजार ५९३ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच न्यायालयातील ४४ प्रलंबित प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड घडवून आणत चार कोटी ५४ लाख २८ हजार ३७३ रुपयांची रक्कम भरून घेण्यात आली. यामध्ये दहा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांचाही समावेश आहे.