Mass Seizures: Engineer Shailesh Gade Confiscates 157 Unauthorized Commercial Hoardings
sakal
शिरूर : अनेक मुख्य मार्गांवरील शासकीय दिशादर्शक फलक, पाट्यांवर आपल्या व्यवसायाची अनधिकृत जाहिरात करणाऱ्या, बेकायदा होर्डींग्ज व फ्लेक्स लावणाऱ्या व्यावसायिकांविरूद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, शिरूर - पाबळ रस्त्यावरील दिशादर्शक फलकांवर बेकायदा जाहिरातींचे फलक लावणाऱ्या चार बांधकाम व्यावसायिक फर्मविरूद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.