Shirur Accident News: काड्यांचे घर अन्‌ पेन्सिलचे छप्पर उडून गेले, बापलेकांचा मृत्यू; सरकारी निष्काळजीपणाचे ठरले बळी

Tragic Road Accident in Shirur : पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील नऊ वर्षाचा तन्मय खेडकर दररोज वडिलांच्या गाडीवर शाळेत जायचा.
viral photo of Tanmay Khedkar
Tanmay Khedkar Road Accident esakal
Updated on

शिक्रापूर : बाप चहाची टपरी चालवायचा अन्‌ आई शेतीत राबायची. मोठ्ठं व्हायचं आणि बंगला बांधून सगळ्यांना विमानाने फिरवायचं असं म्हणून पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील नऊ वर्षाचा तन्मय खेडकर दररोज वडिलांच्या गाडीवर शाळेत जायचा. शाळेत गुरुजींना आपली केवळ स्वप्नच सांगायचा नाही, तर तशी प्रतिकृती बनवून दाखवायचा. असेच काड्यांचे आणि पेन्सिलीच्या साह्याने बनवलेले घर एक चित्र त्याने शाळेतील भोंगळे गुरुजींना दाखवले होते. त्याच तन्मयचा असा दुर्दैवी अंत झाल्याने काड्यांचे घर आणि पेन्सिलीचे छप्पर उडून गेल्याची भावना परिसरात दिसून येत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com