Shirur Police Station : शिरूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मदतीसाठी एक लाखांची लाच मागून ९५ हजार स्वीकारणारा फरार हवालदार सतीश मुंढे दीड महिन्यानंतर एसीबीच्या जाळ्यात

Police Constable Arrested in Shirur Bribery Case After One-and-a-Half Months : शिरूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मदतीसाठी वरिष्ठांच्या नावाने लाच मागून ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर फरार झालेल्या हवालदार सतीश मुंढेला एसीबीने अखेर अटक केली असून पोलिस कोठडीत वाढ झाली.
Police Constable Arrested in Shirur Bribery Case After One-and-a-Half Months

Police Constable Arrested in Shirur Bribery Case After One-and-a-Half Months

esakal

Updated on: 

सागर रोकडे

कवठे येमाई : शिरूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने एक लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ९५ हजार रुपये स्वीकारणारा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाला चकवा देत पसार झालेला हवालदार सतीश नाथराव मुंढे (वय ४५) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तब्बल दीड महिना फरार राहिलेल्या मुंढेच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सोमवारी (ता. २३) पर्यंत वाढ केली आहे. लाचेची मागणी करताना मुंढेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख केल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आता नेमके कुठपर्यंत पोहोचणार आणि ‘बड्या साहेबां’चीही चौकशी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Police Bribery Case
Police Constable Satish Mundhe
two groups clashed within the premises of the Shirur Police Station
Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe