
शिरूर : करडे (ता. शिरूर) येथील माजी सैनिकाच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणी फरार असलेल्या संशयित आरोपीच्या संपर्कात राहून त्याला ठिकठिकाणाहून पळून जाण्यास अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या शिरूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला व एका पोलिस हवालदाराला शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिले. एकाच वेळी एक अधिकारी व एक कर्मचारी बेशिस्त, बेजबाबदार गैरवर्तनामुळे निलंबित झाल्याने पोलिस दलासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.