आम्ही नव्या दमाने उतरतोय; भाजप ४७ जणांची नवी टीम घेवून आक्रमक पवित्र्यात

Shirur taluka BJP announced the list of 47 new Party candidate
Shirur taluka BJP announced the list of 47 new Party candidate

शिक्रापूर (पुणे) : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तब्बल ४१ हजारांनी पराभव पहाव्या लागलेल्या शिरुर-भाजपा पक्षसंघटनेने आता पुन्हा नव्याने बांधणी करीत ४७ जणांचा तालुका संघटनेत समावेश केला व नव्या टिमसह थेट राष्ट्रवादीला आव्हान देत पक्ष संघटनेची यादी जाहीर केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान कुठलेच निर्णय नीट घेता येत नसलेल्या महाआघाडीच्या सरकारची ’निष्क्रीय-सरकार’ म्हणून अवहेलना करीत तालुका राष्ट्रवादीने आता निष्क्रीय ठाकरे-सरकारबद्दल जाहीर बोलावे असे यावेळी आव्हानही दिले. शिरुर भाजपचे माजी तालुकाध्यक्षपदी भगवानराव शेळके यांच्यानंतर घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचेही काही काळ तालुकाध्यक्ष राहिलेले दादा पाटील फराटे यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी झाली आणि तालुक्यातील संपूर्ण संघटेनेचीच पुनर्रचना नुकतीच करण्यात आली.

महिनाभरापूर्वी भाजपचा जुने-नवे कार्यकर्ता वाद उफाळून आल्याने दादा पाटील यांनी आपल्या पदाचा नियुक्तीबरोबर लगेचच राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला होता. मात्र जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जुन्या-नव्यांचा मेळ घालीत दादा पाटलांचा राजिनामा मागे घ्यायला लावला व नवीन पक्ष संघटना पुनर्रचना करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार एकुण ४७ जणांची पुनर्रचित पक्षसंघटना यादी दादा पाटील यांनी नुकतीच जाहीर केली.

नवीन नियक्त्या-
राजेंद्र भुजबळ (तळेगाव-ढमढेरे) - कार्याध्यक्ष
जयसिंगशेठ पाचर्णे (तर्डोबाचीवाडी) - कोषाध्यक्ष
राजाभाऊ मांढरे (शिक्रापूर) - तालुका उपाध्यक्ष
डॉ.रवींद्र टेमगिरे (शिक्रापूर) - वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष
रोहीत बाळासाहेब खैरे (शिक्रापूर) - युवा मोर्चा तालुकाध्यक्ष
मोहन पांडे (शिक्रापूर) - उत्तर भारतीय आघाडी तालुकाध्यक्ष
राहूल गवारे (विठ्ठलवाडी) - सहकार आघाडी अध्यक्ष
बाबा दरेकर (सणसवाडी) - कामगार आघाडी अध्यक्ष
संतोष मोरे (तर्डोबाची वाडी)- व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष

इतर नियुक्त्या गावे व त्यांची पदे कंसात पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष : श्रीकांत सातपूते व संदीप ढमढेरे (तळेगाव-ढमढेरे), शामकांत वर्पे (बो-हाडेमळा), अविनाश पवार (सादलगाव), सौ.गितांजली कळसकर (तांदळी) गोरक्ष काळे (संघटन-सरचिटणीस, दहिवडी), रघूनंदन गवारे (सरचिटणीस, विठ्ठलवाडी). चिटणीस : भानुदास रणदिवे (रांजणगाव सांडस), सतिश नलगे (इनामगाव), संपत गव्हाणे (कोरेगाव-भीमा), अरुण तांबे (न्हावरा), सौ.जिजाबाई दुर्गे (निमोणे), संतोष जाधव (उरळगाव), नवनाथ गायकवाड (कार्यालयीन सचिव : मांडवगण) किसनराव बिडगर (जेष्ठ नागरिक आघाडी, न्हावरे), अ‍ॅड.शिवशंकर हिल्लाल (कायदा आघाडी, शिरुर), श्रीकॄष्ण ढमढेरे (अपंग आघाडी, दहिवडी), निलेश सोनवणे (माजी सैनिक आघाडी, निर्वी), अनिकेत राक्षे (विद्यार्थी आघाडी, राक्षेवाडी), सौ.पुनम जगदाळे व ऋतुजा गायकवाड (युवती आघाडी, अनुक्रमे करडे व सादलगाव), प्रविण रणदिवे (सोशल मिडिया आघाडी, रांजणगाव), संतोष काळे (वाहतुक आघाडी, निमोणे), तुकाराम निंबाळकर (आध्यात्मिक आघाडी, गणेगाव दुमला), सतीश घोलप (झोपडपट्टी आघाडी, शिरुर), सुनिल धारवड (मच्छिमार आघाडी, वडगाव-रासई), नितीन ढोरे (धरणग्रस्त आघाडी, वाडा पुनर्वसन), अशोक शेळके (शिक्षक आघाडी, शिरुर), संतोष कोकरे (भटके विमुक्त आघाडी, पारोडी), शहाजी पवार (सांस्कृतिक आघाडी, न्हावरे), महेश बेंद्रे (पद्वीधर आघाडी, आंबळे). 

विविध मोर्चास्तर आघाडी तालुकाध्यक्ष : रोहीत बाळासाहेब खैरे (युवामोर्चा, शिक्रापूर), ज्ञानदेव उर्फ काका खळदकर (किसान मोर्चा, वडागाव-रासई), सौ.वैजयंती राजेंद्र चव्हाण (महिला मोर्चा, सरदवाडी), अरुण तांबे (ओबीसी मोर्चा, तांदळी), दिलीप शेलार (अनुसुचित जाती मोर्चा, विठ्ठलवाडी), संदीप गायकवाड (अनुसुचित जमाती मोर्चा, शिरुर), राजुभाई शेख (अल्पसंख्यांक मोर्चा, शिरुर).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com