Water Shortage: शिरूर तालुक्यामध्ये विविध गावात पाणीटंचाईची गंभीर स्थिती

Shirur Water Shortage, Drought Crisis, Chaskaman Water; शिरूर तालुक्यात पाऊस नसल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी खालावली असून विविध गावांत पाणीटंचाई गंभीर झाली आहे.
A dry government lake in Kasari village, Shirur taluka, highlights the worsening water shortage amid drought conditions.

A dry government lake in Kasari village, Shirur taluka, highlights the worsening water shortage amid drought conditions.

esakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे,: शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढत असून, ठीक ठिकाणी पाणीटंचाईचे गंभीर सावट उभे राहिले आहे. पाणीटंचाई, जनावरांना चारा टंचाई तसेच महागाईने नागरिकांचे जीवन संकटमय झाले आहे. पाऊस नसल्याने विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालवली असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यातील खरिपाचे पीक धोक्यात आल्याने भविष्यात कडधान्यांची व बाजरीची टंचाई निर्माण होणार आहे. खरीप हंगामातील बहुतांश पिके वाया गेल्याने तसेच उत्पादन घटल्याने शेतकरी वर्ग अहवाल दिल झाला आहे. विहिरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने अद्याप रब्बी हंगामातील पेरणी रखडली आहे. ज्वारी, हरभरा, गहू आदींची पेरणी रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com