

Ranjangaon MIDC Police arrested a habitual offender for robbing a woman at knifepoint before she died in a tragic road accident.
esakal
शिरूर : चाकूचा धाक दाखवून लुटल्याने घाबरलेल्या परिस्थितीत परिचितासोबत त्याच्या दूचाकीवरून घरी निघालेल्या आणि टेम्पोच्या धडकेत मृत्युमूखी पडलेल्या महिलेच्या लुटमारीचा छडा लावण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले. या अभागी महिलेला लुटणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.