

Shirwal Accident News
esakal
शिरवळ: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) येथे मंगळवारी पहाटे सातारा बाजूकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने पुणे बाजूकडे जाणाऱ्या मालट्रकला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ ते २० वर्षांची चार तरुण मुले जागीच ठार झाली, तर दोघे जण गंभीर जखमी झाले.