खंडाळा -शिरवळ येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
शिरवळमध्ये श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम
खंडाळा, ता. १ : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिरवळ (ता. खंडाळा) येथे आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी १८ टन कचरा संकलित करण्यात आला.
या अभियानात प्रतिष्ठानच्या सुमारे २०० श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिरवळ येथील बसस्थानक, सरकारी दवाखाना, पोलिस ठाणे, टपाल कार्यालय तसेच शासकीय विश्रामगृह परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यास मदत झाली असून, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली. सार्वजनिक ठिकाणी नेहमी अस्वच्छ असणारा भाग आज चकाचक झाल्याने अनेक शिरवळकर नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, सरपंच रविराज दुधगावकर, पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
06026
शिरवळ : परिसरात स्वच्छता करताना उदय कबुले, रविराज दुधगावकर, शंकर पांगारे, प्रदीप माने व श्री. सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

