शिवछत्रपती क्रीडा संकुलात व्यायामशाळेचे उद्‍घाटन

शिवछत्रपती क्रीडा संकुलात
व्यायामशाळेचे उद्‍घाटन
Published on

पुणे, ता. १६ : .‘‘खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन शिवछत्रपती क्रीडा संकुलातील व्यायामशाळेत आधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ करण्यासाठी तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा फायदा होईल,’’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत सात क्रीडा प्रकारांची उच्च कामगिरी केंद्रे कार्यान्वित आहेत. या केंद्रांमध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंना आधुनिक व्यायाम साहित्य आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अत्याधुनिक व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या वेळी क्रीडा आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, माणिक पाटील आणि क्रीडा अधिकारी चनबस स्वामी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com