शिवजयंती निमित्ताने खिलारवाडीत रक्तदान शिबिर

शिवजयंती निमित्ताने खिलारवाडीत रक्तदान शिबिर

Published on

MHD26B05065
खिलारवाडी (ता. सांगोला) : येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन करताना मान्यवर.
शिवजयंतीनिमित्त खिलारवाडीत रक्तदान शिबिर

महूद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खिलारवाडी (ता. सांगोला) येथे नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्‍घाटन संजय गोडसे, उपसरपंच विनायक बागल, विकास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, माजी उपसरपंच चंद्रकांत बागल, दाजी शिंदे, महादेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमर कोळी, महादेव इंगोले, नवल गाडे, जालिंदर नरळे, नितीन बागल, माजी चेअरमन अरुण बागल, संतोष बागल, रोहित दादा पवार युवा मंच तालुका अध्यक्ष विक्रम बागल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोला ब्लड बँकेच्या सहयोगातून घेण्यात आलेल्या या शिबिरात परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com