मंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधीवत पूजा करून पालखीला खांदा दिला. पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली.
जुन्नर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) शासकीय परंपरेनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली.