आकर्षक अशा फायर शोचे आयोजन शिवजयंती महाउत्सव समितीच्या वतीने (Shiv Jayanti Maha Utsav Committee) करण्यात आले होते.
जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बुधवारी (ता. १८) मध्यरात्री शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरायांना (Shiv Jayanti Shivneri Fort) मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.