छत्रपतींच्या जयंतीनिमित्त चासमध्ये पारंपरिक उत्सव
चास, ता. ७ : ‘‘हिंदू महिलांच्या कपाळावरच कुंकू हे केवळ छत्रपतींमुळे टिकले असून देव, देश आणि धर्मासाठी सर्वांनी जागृत राहण्याची गरज आहे, छत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारा व सामूहिकपणे शिवजयंती साजरी करा,’’ असा बहुमोल सल्ला सुरज महाराज अंतवडीकर यांनी चास (ता. खेड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कीर्तनाच्या कार्यक्रमात दिला.
चास व पंचक्रोशीतील शिवप्रतिष्ठान हिदूस्थान चास, तसेच चास, आखरवाडी, पापळवाडी, मिरजेवाडी, घनवटवाडी व गुंजवठा येथील ग्रामस्थ, तरुण मंडळे व युवकांच्या वतीने चास येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला. सामुहिक शिवजयंतीचे हे सोळावे वर्ष असून गेली पंधरा वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी चास व पंचक्रोशीतील सुमारे १०० ते १२० तरूणांनी शिवनेरीवरून दौडीने शिवज्योत आणून हि शिवज्योत छत्रपती शिवरायांच्या फुलांनी सजविलेल्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ठेवण्यात आली. सायंकाळी हिंदू ध्वजाच्या स्थानापासून छत्रपतींच्या पुतळ्याची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवरून भव्य मिरवणुक काढली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या घोषणां बरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीत, तोफांच्या सलामीत चास व परिसर शिवभक्तिमय झाला होता. अग्रभागी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा, शिवज्योत व महाराजांची पालखी, रामभक्त हनुमान तसेच वानरांच्या वेशभूषा केलेली पात्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. मोठ्या थाटात सोहळा चास गावातून मार्गक्रमीत होत असताना नागरिकही त्यामध्ये सहभागी झाले होते.
मिरवणूक सोहळ्यानंतर गावाच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाळणा गीते गायली गेली. छत्रपतींच्या चरित्रावर आधारीत सुरज महाराज अंतवडीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाबाबत बोलताना महाराजांना अश्रू अनावर झाले तर उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहून डोळ्यातून अश्रू वहात होते. या संपूर्ण कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती. या कार्यक्रमात नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्या कविता राक्षे व उपसरपंच सविता रहाणे यांचा शिवजयंती उत्सव समिती चास व चास पंचक्रोशीच्या वतीने नागरी सत्कार केला. अन्नप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यकमाचे संपूर्ण नियोजन शिवजयंती उत्सव समिती चास व पंचक्रोशी, समस्त वारकरी संप्रदाय चास व पंचक्रोशी यांच्या वतीने केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

