17 वर्षापासून डीजे मुक्त शिवजयंती
NRK26A00632
डिकसळ (ता.मोहोळ) ः येथे शिवजयंतीनिमित्त आरोग्य तपासणी अहवाल प्रदान करताना ॲड. श्रीरंग लाळे व विविध मान्यवर.
अठरापगड जातींना घेऊनच शिवराज्याची निर्मिती करूया
ॲड. श्रीरंग लाळे; छत्रपती प्रतिष्ठानची १७ वर्षांपासून डीजेमुक्त शिवजयंती उत्सव
नरखेड, ता. २५ ः छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला सोबत घेऊन शिवराज्याची निर्मिती केली. त्यानुसारच आपणही सर्वांनी एकत्रित येऊन शिवजयंतीच्या माध्यमातून शिवराज्यांचा वारसा पुढे चालू ठेवूया असे आवाहन ॲड. श्रीरंग लाळे यांनी डिकसळ (ता. मोहोळ) येथील शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाचून नाही तर त्यांचे चरित्र वाचून समजून घेतले पाहिजेत, असे मत निरंजन धावणे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. श्रीरंग लाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
डिकसळ येथील छत्रपती प्रतिष्ठान २००९ पासून शिवजयंती डीजेमुक्त साजरी करीत आहेत. विशेष बाब म्हणजे मिरवणुकीच्या खर्चातून विविध विधायक उपक्रम राबवत आहेत. चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मतदान दुरुस्ती व नवीन नोंदणी शिबिर लाभ. ५० नागरिकांच्या मतदार यादितील त्रुटी दुरुस्ती करण्यात आली. आरोग्य शिबिरात ७६ नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमास गोविंद पाटील, हनुमंत धावणे, गोरख गाटे, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष महेश धावणे, तानाजी धावणे, समाधान गाटे, शिवाजी धावणे, हरिविजय धावणे, उदय धावणे, सचिन धावणे, शिवरत्न पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

