होदेगिरी येथे ‘शिवजन्मोत्सव २०२६’चा ऐतिहासिक संकल्प; जयहिंद फाउंडेशनचा सीमापार संस्कृती प्रसार उपक्रम

होदेगिरी येथे ‘शिवजन्मोत्सव २०२६’चा ऐतिहासिक संकल्प; जयहिंद फाउंडेशनचा सीमापार संस्कृती प्रसार उपक्रम

Published on

होदेगिरीत शिवजन्मोत्सव

आनेवाडी, ता. २१ : संकल्प जयहिंद फाउंडेशनतर्फे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांच्या कर्नाटकातील होदेगिरी येथील समाधिस्थळी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून छत्रपती शिवरायांचा इतिहास, पराक्रम आणि संस्कृतीचा संदेश देशभर पोहोचवण्याच्या उद्देशाने फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप माने व सचिव हनुमंत मांढरे यांनी २०२३ मध्ये जम्मू-काश्मीर, २०२४ मध्ये गोवा, तर २०२५ मध्ये पानिपत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा होदेगिरीची निवड करण्यात आली. यंदा सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मराठी परंपरेनुसार पाळणा गायन, सुंठवडा वितरण आणि सामूहिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवचरित्रातील पराक्रम उलगडणाऱ्या शिवनाटिका, शाहिरांचे पोवाडे आणि अभ्यासकांची व्याख्याने यांद्वारे उपस्थितांना इतिहासाचे सखोल दर्शन घडवले. विशेष म्हणजे, होदेगिरी परिसरात शिवजयंतीची परंपरा जपणाऱ्या स्थानिक शिवभक्तांचा सत्कार करून त्यांचे योगदान गौरविण्यात आले. यावेळी सैनिक कुटुंबीय, हुतात्मा परिवारांचे सदस्य, तसेच युवक-युवतींसह सर्व वयोगटांतील शिवप्रेमी उत्साहाने सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com