पुणे
शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यातील आठवडे बाजार बंद
लोणावळा, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या वतीने हा आदेश जारी केला आहे.
शिवजयंतीनिमित्त शहरात शिवज्योत मिरवणूक भांगरवाडी रस्ता तसेच हनुमान टेकडी रस्ता मार्गे काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

