छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात शिवजयंती उत्साहात
लोणावळा, ता. ७ : लोणावळा नगरपालिकेच्या गवळीवाडा येथील शाळा क्रमांक ६ छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच गवळीवाडा येथील राम मंदिरापासून शिवज्योत आणून तिचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात लोकनाट्य, पोवाडा सादरीकरण तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून वातावरण शिवमय झाले होते. यावेळी नगरसेविका व शिक्षण विभागाच्या सभापती दीपिका अगरवाल, तसेच वार्डातील नगरसेविका वैशाली मोगरे आणि नगरसेवक अनिल गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालकवर्ग, मान्यवर मंडळी, अंगणवाडीच्या शिक्षिका तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून उपस्थित मान्यवरांनी शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

