पानगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
PGN26B01341
पानगाव (ता. बार्शी) : येथे छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी प्रतिष्ठानचे सभासद आणि ग्रामस्थ.
पानगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
पानगाव : बार्शी तालुक्यातील पानगाव येथील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद कसबे तसेच तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष अप्पासाहेब कानगुडे, तानाजी ढेरे, हनुमंत कानगुडे, विद्याधर गव्हाणे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संत तुकाराम विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्श मित्र मंडळ धाकटा मारुती चौक, सुहास मोरे चौक, आदी ठिकाणीही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळांच्या वतीने गावातील प्रमुख पालखी मार्गावरून शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पथनाट्य, लेझीम यांचा समावेश होता. पानगावचे सरपंच जयसिंगराव देशमुख, माजी सरपंच दयानंद गाडे, मुख्याध्यापक आनंद कसबे, मिनाक्षी पवार,सुधीर कुलकर्णी, अजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि शेकडो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने नितीन कानगुडे, आबासाहेब ताटे, हनुमंत कानगुडे, प्रमोद ढेरे, प्रकाश कानगुडे आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

