Shiv Jayanti 2024 : बारामतीत शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पालखीला सुरवात झाली.
Shiv Jayanti was celebrated in traditional manner in Baramati
Shiv Jayanti was celebrated in traditional manner in BaramatiSakal

Baramati News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती जन्मोत्सव समितीने पारंपरिक पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते. कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पालखीची शोभायात्रा सुरू झाली.

यावेळी जय पवार, सुनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर , तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह सदाशिव सातव, सचिन सातव, प्रशांत नाना सातव, श्रीनिवास वायकर, सुभाष सोमणी, हेमंत नवसारे, आबा सोळसकर, किरण इंगळे, योगेश सावंत, संभाजी माने यावेळी उपस्थित होते.

पालखी मध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपणारे पारंपारिक वाद्य पथके जसे ढोल पथक,हलगी पथक, वारकरी पथक,मर्दानी खेळांचे लाठीकाठी पथक सहभागी झाले होते. स्वराज्य रक्षक रणमर्द मावळ्यांचे पथक तसेच स्वराज्याचे गुप्तहेर जसे वासुदेव,पिंगळा, पोतराज, गोंधळी ,नंदीबैलवाले यांचेही पथक मिरवणूक सोहळ्यामध्ये समाविष्ट होते.

शहरातील लहान मुले व मुली,तरुण तरुणी यांनी मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. पालखीचे प्रमुख आकर्षण रणमर्द मावळ्यांचे पथक व स्वराज्याचे गुप्तहेर यांचे पथक बारामती करांसाठी पर्वणी ठरली हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते पालखी सोहळ्याचे आयोजन रोहन ढवाण, अमरेंद्र महाडिक, सुदित तावरे, सुमित रेडे, रोहन शेरकर,चारुदत्त काळे,संदीप जाधव, सागर जाधव, श्रेयस काळे, अभयसिंह पवार, मयुर कुंभार यांनी केले.

मिरवणुकीचे ठीक ठिकाणी भव्य स्वागत...

मिरवणुक मार्गावर राजे ग्रुप शिवजयंती उत्सव समिती, सन्मित्र गणेशोत्सव शिवजयंती समिती, अखिल कसबा ग्रुप, चंदूकाका सराफ अँड सन्स, शिवराज्य प्रतिष्ठान, एकता तरुण मंडळ,लोकायत विकास प्रतिष्ठान,

इफ्तकार अन्सार आत्तार मित्र मंडळ, शिव साम्राज्य प्रतिष्ठान, सर्वधर्म समभाव समिती,जय जवान गणेशोत्सव तरुण मंडळ, योगेश सस्ते मित्रपरिवार, गायत्री चहा मित्रपरिवार,प्रतीक ढवाण पाटील मित्र परिवार, झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य, न्यू क्रांती युवा प्रतिष्ठान, नितीन चव्हाण मित्रपरिवार, मृत्युंजय प्रतिष्ठान,के ग्रुप बारामती,

आर के ग्रुप, जगदंब प्रतिष्ठान, सिद्धी गणेश प्रतिष्ठान, सुवर्णक्षण प्रतिष्ठान, निलेश इंगुले मित्रपरिवार, सिंह गर्जना प्रतिष्ठान, शिव योद्धा ग्रुप, रणझुंजार प्रतिष्ठान, सोहम वाडेकर मित्रपरिवार,आई तुळजाभवानी प्रतिष्ठान, श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने शहरात मिरवणुकीचे स्वागत केले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com