शिवजयंती निमित्त संपन्न झाली भव्य महिला रॅली जिजाऊंच्या रूपातील प्रतीक्षा लोणकर ठरल्या भगवा फेटा रॅलीचे केंद्रबिंदू
MGV26B15407
मंगळवेढा : शिवजयंतीनिमित्त येथील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिंनी व महिलांनी काढलेली रॅली.
............
जिजाऊंची भूमिका साकारत प्रतीक्षांनी वेधले लक्ष
शिवजयंतीनिमित्त मंगळवेढा शहरात महिलांची रॅली
.........
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २० : शिवजयंतीनिमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित भगवा फेटा रॅलीमध्ये जिजाऊंची भूमिका साकारत प्रतीक्षा लोणकर यांनी शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
ही भगवा फेटा रॅली शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष अॅड सुजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश स्कूल ते शिवतीर्थदरम्यान भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांच्या सहभागाने आयोजित केली. प्रारंभी स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्यास नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या हस्ते. डॉ. सुभाष कदम, डॉ. मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी कदम यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रांगणात शिवजयंती सोहळा संपन्न झाला त्यात पाळणा गीत सादर करण्यात आले. यानंतर रॅली संत दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, शिवतीर्थ, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक मार्गे शिवतीर्थावर पोहोचली. संपूर्ण मार्गावर ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते. रॅलीनंतर माहेश्वरी महाडीक हिने मनोगत व्यक्त केले.
शिवजयंती उत्सवातून विचारांची प्रेरणा मिळावी, हा संदेश या रॅलीतून प्रभावीपणे देण्यात आला. शिवमंचावर संस्थेच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी उत्सव समितीच्या वतीने रॅली यशस्वी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक आश्पाक काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने, लता ओमणे, प्राचार्य कल्याण भोसले, जयराम आलदर, रमेश पवार, अजित शिंदे, सुभाष बाबर यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याच्या इतर सर्व शाखातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
जिजाऊंच्या रूपातील प्रतीक्षा लोणकर यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला वेगळी उंची मिळाली. दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, शिवतेज फार्मसी कॉलेज, इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महिला शिक्षिका तसेच स्थानिक शहरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

