श्री रामलिंग महाराजांच्या पावनभूमीत भक्तिभावाचा ‘प्रकाश’
श्री रामलिंग महाराजांच्या पावनभूमीत
भक्तिभावाचा ‘प्रकाश’
शिरूरच्या पवित्र आणि पुण्यवान भूमीवर नुकताच श्री शिव महापुराण कथा सोहळा पार पडला. शिरूरनगरीचे भूषण व भूमिपुत्र श्री. प्रकाशभाऊ धारिवाल यांनी शिरूर शहर व पंचक्रोशीतील जनतेला सोबत घेऊन या धार्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले. या ऐतिहासिक सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झाले. त्यांना परमसुखाची स्वर्गीय अनुभूती सोहळ्यातून मिळाली. राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक या सोहळ्यातील अप्रतिम अशा नेटक्या संयोजनामुळे सुखावले. शिरूरच्या पावनभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे रामलिंगाच्या नगरीचे नाव सर्व दूर पोहचले. सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा सोहळा नुकताच संपन्न झाला आणि त्याचे सारे श्रेय प्रकाशभाऊ धारिवाल यांच्याकडे गेले, ते त्यांच्या नेटक्या संयोजनामुळे आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या आयोजनामुळे...
प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या पवित्र पावनभूमीत आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथासोहळ्यामुळे शिरूर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमुळे लाखो भाविकांच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मकतेची ज्योत प्रज्वलित झाली.
प्रसिद्ध उद्योगपती व श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या पुढाकारातून या भव्य आणि दिव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांसह सामाजिक व धार्मिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. शिरूर येथील श्री रामलिंग महाराज देवस्थान हे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. कथावाचनादरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी या भूमीचा उल्लेख करताना सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या प्रवासादरम्यान प्रभू श्रीरामांनी विश्वकल्याणासाठी अनेक ठिकाणी शिवपिंडींची स्थापना केली, त्यापैकी शिरूर येथील श्री रामलिंग मंदिर हे एक महत्त्वाचे देवस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या पवित्रभूमीत उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या माध्यमातून भव्य दिव्य शिवमहापुराण कथासोहळा होणे, ही शिरूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
पी. आर. धारिवाल फाऊंडेशनच्या वतीने, तसेच (स्व.) रसिकलाल धारिवाल व (स्व.) सौ. कमलबाई धारिवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कथासोहळा आयोजित करण्यात आला होता. सुमारे २५ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य धर्मसभामंडपात दररोज लाखो शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ आणि ‘प्रभू श्री रामलिंग महाराज की जय’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून शिवतत्त्वाचे महत्त्व, श्रद्धा, विश्वास, समर्पण आणि सदाचार यांचा प्रभावी संदेश दिला. ‘एक लोटा जल सारी समस्या का हल’ हा संदेश देत त्यांनी सांगितले की, दृढ श्रद्धा आणि निःस्वार्थ भावनेने केलेली शिवभक्ती मनुष्याला संकटांवर मात करण्याची शक्ती देते. शिवपुराण ही केवळ कथा नसून, ती जीवनाला दिशा देणारी आणि समाजाला सजग करणारी गाथा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ
या भव्य कथा सोहळ्याच्या आयोजनातून प्रकाशभाऊ धारिवाल यांची समाजाप्रति असलेली बांधिलकी आणि दूरदृष्टी अधोरेखित झाली. धार्मिक परंपरा जपत समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा, लोकांच्या मनात श्रद्धा, संयम आणि सदाचाराची भावना रुजावी, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा न ठरता समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ ठरला.
‘माता कमला की रसोई’
अन्नदानाचा अखंड यज्ञ
श्री शिव महापुराण कथेसाठी राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांसाठी पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून बनविलेले ‘माता कमला की रसोई’ हे प्रसादालय भक्ती आणि सेवेचे केंद्र ठरले. येथे कधी जिलेबी, कधी बुंदी, कधी बालुशाही; तर कधी आमरस, अशा गोड पदार्थांसह पंचपक्वान्नांचा प्रेमाने घास वाढला गेला. हवेशीर आणि सुसज्ज अशा प्रसादालयात एकावेळी सुमारे तीन हजार जण बसून भोजन करू शकले. सकाळी चहा, तर दुपारी व संध्याकाळी दोन वेळचे जेवण, अशी सर्व सुविधायुक्त व्यवस्था केली होती. पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने उभारलेल्या या प्रसादालयाला (स्व.) कमलबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ ‘माता कमला की रसोई’ असे नाव देण्यात आले आहे. फुलके किंवा चपाती, दोन भाज्या, वरण- भात आणि गोड पदार्थ, असा स्वादिष्ट प्रसाद कथा काळात येथे दिला गेला. सात दिवसांत लाखो भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला. या सेवेची माहिती मिळताच खुद्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प. पू. पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी स्वतः प्रसादालयाला भेट देत भाविकांना भोजन वाढण्याची सेवा केली. हा क्षण अविस्मरणीय ठरला. पुण्यातील आचारी नारायण महाराज व त्यांच्या २५० सहकाऱ्यांच्या मदतीने हा अन्नदानाचा यज्ञ सात दिवस अखंडपणे सुरू होता. येथे केवळ पोटभर जेवणच नव्हे; तर मायेचा घास मिळाल्याने भक्तांचे मनही तृप्त झाले.
आदरणीय प्रकाशभाऊ, आपण पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या पावनभूमीत श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करून लाखो शिवभक्तांच्या मनामनांत भक्तिभावाचा ‘प्रकाश’ पाडण्याचे महान पुण्यकर्म केले आहे. या पवित्र उपक्रमामुळे शिरूर नगरीचे नाव आणखी वृद्धींगत केले आहे. या उदात्त कार्याबद्दल माननीय प्रकाशभाऊ आपले मनःपूर्वक आभार! तसेच आपल्या भावी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्याला जन्मदिनानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन व मंगलमय शुभेच्छा...!
PAB26B01801
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

