विचार प्रबोधन पर्व बातमी

विचार प्रबोधन पर्व बातमी
Published on

PNE26W47763
सोलापूर : शिवप्रबोधन पर्वात मार्गदर्शन करताना शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे.
---
PNE26W47762
शिवप्रबोधन पर्वास उपस्थित जेन झींसह श्रोतेगण.
---
संकटकाळात शिवचरित्रच सकारात्मकतेची वाट दाखवते
डॉ. शिवरत्न शेटे; भुईकोट किल्ल्यात शिवप्रबोधन कार्यक्रमास ‘जेन झी’ची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : आयुष्यात संकटे आली म्हणून खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून घ्यावी. संकटाच्या काळात शिवचरित्राचा आधार घेतल्यास विचार सकारात्मक होतात. परमेश्वराने दिलेले जीवन सुंदर आहे, त्यामुळे तरुणांनी कोणत्याही कारणामुळे नैराश्यात जाऊ नये, असे आवाहन शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
हिंदवी परिवारातर्फे रविवारी भुईकोट किल्ल्यात आयोजित शिवप्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रगीताने प्रारंभ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. राज्य उपाध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर यांनी शिवचरित्रातील काही भागाचे वाचन केले.
---
देश व समाज उन्नतीत मातृशक्तीचे योगदान महत्त्वाचे
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मावळ्यांनी मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि निजामशाहीशी संघर्ष केला; मात्र घाबरणे, निराश होणे त्यांना माहिती नव्हते. त्यांची जिद्द, धैर्य आणि सकारात्मकता तरुणांनी आत्मसात करावी. गर्भवती असताना पित्याची व भावाची हत्या पाहूनही हिंदवी स्वराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कणखरपणे जगलेल्या जिजामातांचा आदर्श माता-भगिनींनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
---
इतिहास वाचल्याशिवाय आदर्श कसा कळणार?
हिंदू धर्म म्हणजे भारतीय संस्कृती असून ती विज्ञानाने परिपूर्ण आहे. आपल्या इतिहासात विज्ञान असून पूर्वज विज्ञानवादी होते. तरुणांनी शिवभारत, जेधे शकावली, सभासद बखर यांसारखी अस्सल साधने वाचावीत, असे आवाहन त्यांनी केले. शिवरायांच्या मार्गावर वाटचाल केल्यास सिया अग्रवाल, इंदापूरमधील मुलांकडून आई-वडिलांना मारहाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील आत्महत्येसारख्या घटना टाळण्यास मदत होईल. ‘शिवचरित्रातील आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नैराश्यात जाणार नाही,’ असा संकल्प त्यांनी तरुणाईकडून वदवून घेतला.
---
‘मी तुमचा मामा; समस्या सांगा’
संवादाचा अभाव झाल्यास समस्या वाढतात. तुमच्यातच भारताला महासत्ता बनविण्याची क्षमता आहे. ‘मी तुमचा मामा आहे. कोणतीही समस्या असेल तर पालकांसोबत भेटा,’ असे आवाहन त्यांनी केले. सोलापूरसह पंढरपूर, धाराशिव, वळसंग, मंद्रूप, मैंदर्गी येथून मुली, महिला व शिवभक्त उपस्थित होते. तुषार आवताडे, अमोल शिंदे, पद्माकर काळे, श्रीकांत डांगे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते. वंदे मातरम्‌ने शिवप्रबोधनाचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com