मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली- आमदार अभिजित पाटील

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली- आमदार अभिजित पाटील

Published on

TMB26B03818
टेंभुर्णी ः शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाचा प्रकाशन सोहळ्यात आमदार अभिजित पाटील, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, सूरज देशमुख, ऋतुराज सावंत व अन्य.

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा
आमदार अभिजित पाटील; शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाचे प्रकाशन

टेंभुर्णी, ता. २२ : मराठा सेवा संघाने समाजात काम करत असताना शिवजयंती कशी साजरी करावी, याची समाजाला दिशा दिली. शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित केलेला शिवसंदेश-शिवजयंती विशेषांक तालुक्यातील तरुणांनी अवश्य वाचावा, तरुणांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन व्यसनमुक्त राहावे असे मत आमदार अभिजित पाटील यांनी शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

यावेळी बाळासाहेब पाटील, ऋतुराज सावंत, सचिन जगताप, डॉ. धनाजी खताळ, टेंभुर्णीतील ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांची भाषणे झाली. व्याख्याते खंडुजी डोईफोडे यांचे शिवव्याख्यान झाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख, ऋतुराज सावंत उपस्थित होते. शिव व्याख्याते खंडुजी डोईफोडे, उद्योजक विजय देशमुख, डॉ. धनाजी खताळ, दादासाहेब देशमुख, नीलेश देशमुख, सचिन जगताप, बाळासाहेब वागज, दिगंबर मिसाळ, सचिन पराडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com