esakal | राज्याला तीन मुख्यमंत्री, पण स्टेअरिंग 'यांच्या' हाती!
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav_Thackeray_Sharad_Pawar_Ajit_Pawar

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसून, तोंडदेखल्या बैठका घेऊन केवळ स्वतःची खुर्ची वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप मेटे यांनी केला.

राज्याला तीन मुख्यमंत्री, पण स्टेअरिंग 'यांच्या' हाती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुपर मुख्यमंत्री शरद पवार असे महाविकास आघाडी सरकारचे तीन मुख्यमंत्री असूनही त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही,'' अशी टीका करतानाच "सरकारचे स्टेअरिंग उद्धव ठाकरे यांच्या नाही, तर ते आपल्याच हाती आहे, हे अजित पवारांनी दाखवून दिले आहे,'' असा टोलाही शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सोमवारी (ता.२७) लगावला. 

Video : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 'मनसे'चं बेड टाकत आंदोलन; पाहा काय केल्या मागण्या​

नुकत्याच एका मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचे स्टिअरिंग आपल्या हाती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ट्‌विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दोघांचे इलेक्‍ट्रिक कारमधील छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात कारचे स्टिअरिंग अजित पवारांच्या हाती आहे. त्यावरून मेटे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. 

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनात्मक विषय असल्याने ती घटनापीठाकडे द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालय २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

काय सांगता? दुकानदाराला छत्री पडली पावणे दोन लाखाला!

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसून, तोंडदेखल्या बैठका घेऊन केवळ स्वतःची खुर्ची वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप मेटे यांनी केला. ते पुढे म्हणाले, "मराठा आरक्षणावरील याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पुढील आदेशापर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून नोकर भरतीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याला राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image