दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दांडिया गरबा २०२६ रद्द, संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दांडिया गरबा २०२६ रद्द, संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
Published on: 

URA26A00464 : प्रकाश राठोड

दुष्काळामुळे शिवसेनेचा गरबा रद्द
गरब्याचा संपूर्ण निधी शेतकरी मदतीसाठी; लवकरच मदत कक्ष सुरू करणार
सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. ११ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा ‘शिवसेना दांडिया गरबा २०२६’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमासाठीचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रकाश राठोड यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने व राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले. स्वतः शेतकरी असल्याने दुष्काळाचा फटका शेतकरी, त्यांची पिके आणि जनावरांना बसणार असल्याची जाणीव आहे. त्यामुळे गरबा रद्द करून निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, सोलापुरात लवकरच ‘शिवसेना शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था तसेच पीकविमा आणि शासकीय अनुदानाबाबत मार्गदर्शन करून मदत वेळेत पोचवण्याचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. पुढील वर्षी पाऊस चांगला झाल्यानंतर दुप्पट उत्साहात गरबा साजरा करू, असे आवाहन राठोड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com