esakal | Breaking:पुणे महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार:संजय राऊत

बोलून बातमी शोधा

shiv sena mp sanjay raut statement on election alliance ncp}

शिवसेना खासदार संजय राऊत आज, पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

pune
Breaking:पुणे महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार:संजय राऊत
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : पुण्यासह इतर महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी तर एकत्र लढतीलच पण, काँग्रेसलाही यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल हे स्पष्ट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद असल्याने त्यांना जागा वाटपात त्यांना जास्त संधी मिळेल. पण, एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने असेल, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राष्ट्रहितासाठी पंतप्रधान मोदींवर टीका होत असेल तर ती योग्यच आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले संजय राऊत?

  • भाजप प्रवेशासाठी मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना शुभेच्छा
  • आमच्या प्रयत्नांमुळेच राम मंदिर आंदोलनाला धार आली
  • डॉ. अब्दुल कलाम यांच्या वक्तव्यामुळं चंद्रकांत पाटील यांचं हसं
  • पर्यावरणाबद्दल बोलणाऱ्यांमुळं देशाला धोका कसा?
  • इतका महान देशाला, 14-15 वर्षांच्या मुलांमुळं कसा काय धोका?
  • मोदींवर कोणी व्यक्तीशः कोणी टीका करत नाही
  • पुण्यात बैठका सुरू; एकत्रित निवडणुकांचे सूत्र ठरलेले आहे
  • शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आहेतच; काँग्रेसलाही सोबत घेऊ
  • बंगालमध्ये भाजपच्या नेत्यांकडं कोकेन सापडलं त्याची बातमी नाही
  • मुंबईत कोणाकडं काही ग्रॅम सापडलं तर, नॅशनल न्यूज